नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या ‘पैसे देणारं घर’ या अभूतपूर्व ऑफरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. २४ ते २८ डिसेंबरदरम्यान तब्बल १३२ कुटुंबांनी अर्पण विहारला पसंती दिली.
घरांची सुनियोजित रचना, पंचवटीसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागातील हिरावाडीचे लोकेशन, उत्तम दर्जाचे बांधकाम, आकर्षक व सुबक आर्किटेक्चर, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक २५ पेक्षा अधिक सर्वोपयोगी अॅमेनिटीज, किफायतशीर किंमत आणि ग्राहकांचा ए. सी. जैन बिल्डर्सवर असलेला विश्वास यांच्या बळावर आम्ही हा विक्रम घडवू शकलो, अशी माहिती कंपनीचे संचालक अभय जैन यांनी दिली.
बांधकाम क्षेत्रातील तब्बल २० वर्षांच्या अनुभवानंतर ए. सी. जैन यांनी २०१२ मध्ये गृहनिर्मितीकडे वळण्याचे ठरवले आणि ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीची स्थापना केली व नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात जिल्ह्यातील पहिली रेरा नोंदणी असलेली कंपनी होण्याचा मान मिळवला.
आम्ही आजवर १४ पेक्षा अधिक प्रकल्प नाशिक शहराच्या विविध प्राइम लोकेशन्सवर पूर्ण केले आहेत. ५६० पेक्षा अधिक कुटुंबांचे गृहस्वप्न आणि ५० पेक्षा अधिक लोकांचे व्यवसायाचे स्वप्न शाश्वत यशस्वी निर्मितीतून साकार केले आहे.
तब्बल तीन लाख ५० हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम त्यांनी या माध्यमातून पूर्ण केले आहे. सध्या ६०० पेक्षा अधिक घरांचे बांधकाम सुरू असून, घरे लवकरच पझेशनसाठी तयार होत आहेत, अशी माहिती ऋषभ जैन यांनी दिली.
Publication: पुढारी – Nashik Edition
Date: 29 December 2022
Page: 12




