Lokmat25 Aug. 20262 min read

Footprints of Innovation…

ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे नाव नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवून आहे. आकर्षक आणि मजबूत बांधकाम, बांधकामातील प्रगत तंत्रज्ञान, सर्वसामान्यांना प्राईम शहराच्या लोकेशनवर घरे उपलब्ध करून देण्याची तयारी आणि बांधकामातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांसह सर्व सुख-सोयी गृहप्रकल्पातच देऊन अगदी वेळेवर पझेशन यामुळे या कंपनीची एक वेगळी ओळख आहे.

श्री. अभय सी. जैन यांनी प्रवरा, नगर येथे सिव्हिल इंजिनिअरची पदवी संपादन करून सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून सन १९९२ मध्ये करिअरची सुरुवात केली.

अनेक खाजगी व सरकारी प्रकल्पांच्या पूर्तीनंतर आपल्या २० वर्षांच्या अनुभवाच्या बळावर त्यांनी सन २०१२ साली बांधकाम क्षेत्रात गृहनिर्मितीकडे वळण्याचे ठरवले आणि ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीची स्थापना केली.

आजवर १४ पेक्षा अधिक प्रकल्प नाशिक शहराच्या विविध प्राईम लोकेशनवर पूर्ण केले आहेत. ५६० पेक्षा अधिक कुटुंबांचे गृहस्वप्न आणि ५० पेक्षा अधिक लोकांचे व्यवसायाचे स्वप्न ५० शॉप्सच्या यशस्वी निर्मितीतून साकार केले आहे.

तब्बल ३ लाख ५० हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम त्यांनी पूर्ण केले आहे. सध्या ६०० पेक्षा अधिक घरांचे बांधकाम सुरू असून ६ लाख स्क्वेअर फुटांचे हे काम लवकरच पझेशनसाठी तयार होत आहे.

याशिवाय भविष्यात तब्बल ६ लाख ७५ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम कंपनीच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत होणार असून हा अल्ट्रा लक्झरी होम्सचा भव्य प्रकल्प असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात ही जिल्ह्यातील पहिली RERA नोंदणी असलेली कंपनी आहे. कंपनीचे भविष्य उज्ज्वल असून पुढील पिढीचे नेतृत्व श्री. ऋषभ जैन हे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्याच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवत मागील तीन वर्षांपासून करीत आहेत.

Project Details

Arpan Vihar – 1 & 2 BHK Homes
Location: Hirawadi Road, Panchavati
1 BHK: ₹22.51 lakh onwards
2 BHK: ₹27.51 lakh onwards
Amenities: 15+
Contact: 777 000 5828

Developer: AC Jain Builders & Developers / Ananda Developers
Corporate Office: Vitraag Bungalow, Gopal Nagar, Artillery Centre Road, Nashik Road – 422101